January 6, 2025 7:47 PM January 6, 2025 7:47 PM

views 8

विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ-एचडी कुमारस्वामी

केंद्र सरकारनं स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आज सुरू केली. विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ आहे. उच्च दर्जाच्या स्टीलला असलेली मागणी, आयात कमी करायला आणि आत्मनिर्भर भारतासाठी योग्य संधी असल्याचं केंद्रीय स्टील आणि अवजड़ उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले.    देशातल्या स्टील उद्योगाला अधिकाधिक सवलती देण्यावर सरकारचा भर आहे. ही योजना अधिक गुंतवणूकस्नेही असल्याचं मंत्रालयाचे सचिव संदीप पोन्ड्रीक म्हणाले.    या योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रुपयांहून...

January 5, 2025 7:47 PM January 5, 2025 7:47 PM

views 5

केंद्रीय पोलाद मंत्र्यांच्या हस्ते उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना वन पॉईंट वनचा प्रारंभ

केंद्रीय पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी उद्या नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं पोलाद उद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना वन पॉईंट वन चा प्रारंभ करतील. या योजनेमुळे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तसंच १४ हजारांपेक्षा जास्त रोजगारही निर्माण झाले आहेत असं पोलाद मंत्रालयानं म्हटलं आहे.

September 19, 2024 8:17 PM September 19, 2024 8:17 PM

views 4

२०३० पर्यंत ३०० मेट्रिक टन पोलाद क्षमता गाठण्याचं भारताचं उद्दिष्ट – केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी

भारतानं २०३० पर्यंत ३०० मेट्रिक टन पोलाद क्षमता गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. पोलादातील हरितक्रांती आणि शाश्वत नवोन्मेषता या विषयावर मुंबईत आयोजित ३६ व्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरण हे हरित परिवर्तनासाठी महत्त्वाचं असून हे धोरण हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर आणि संपूर्ण उद्योगात कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.  यावेळी भारतीय पोलाद क्षेत्रावरील हँडबुकचं प्रकाश...