January 5, 2025 7:40 PM

views 17

पॅरासिटामोलची निर्मिती करण्यासाठी स्वदेशी तत्रंज्ञान विकसित

सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं पॅरासिटामोल या वेदनाशामक आणि तापावरच्या गुणकारी औषधाची निर्मिती करण्यासाठी एक स्वदेशी तत्रंज्ञान विकसित केलं आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ते आज सीएसआयआर च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या संशोधनामुळे भारताला पॅरासिटामोलच्या निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होता येईल तसंच या औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांसाठीचं आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, असं ते म्हणाले.  

December 23, 2024 10:14 AM

views 16

राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन होणार

कर्मचारी, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिह आज नवी दिल्लीत चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत. विविध मंत्रालयं आणि खात्यांमधले अधिकारी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. गेल्या चार वर्षांमधली ही अशा प्रकारची चौथी कार्यशाळा आहे. 19 ते 25 डिसेंबर या काळात सुशासन सप्ताह साजरा केला जातो. त्याचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचं आयोजन केलं जात आहे.

August 31, 2024 8:23 PM

views 27

जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण प्रसिद्ध

जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण केंद्र सरकारनं आज प्रसिद्ध केलं. या धोरणामुळे देशातल्या जैविक उत्पादनामध्ये वाढ होईल असं  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले. गेल्या आठवड्यात मंत्रीमंडळानं या धोरणाला मंजुरी दिली होती. या धोरणाचा परिणाम अन्ननिर्मिती, ऊर्जानिर्मिती आणि आरोग्य सेवांवर पडेल असंही त्यांनी सांगितलं. या धोरणाच्या अंमलबजावणीत सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या आधारे रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल.