December 16, 2024 8:26 PM December 16, 2024 8:26 PM

views 2

प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती

देशातली विविध राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची माहिती पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लोकसभेत दिली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई केल्यानंतर प्रचंड प्रदूषण करणाऱ्या ६६९ उद्योग बंद झाले आहेत. मात्र, उर्वरित २ हजार ८५० उद्योग अद्याप कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी १०४ प्रदुषणकारी उद्योगांमध्ये पर्यावरण मानकांचं पालन केलं जात नसल्याचं आढळल्याचंही यादव यांनी यावेळी सांगितलं.

September 17, 2024 7:57 PM September 17, 2024 7:57 PM

views 8

भारत हा पॅरिस कराराअंतर्गत निर्देशांकातले टप्पे वेळेआधीच गाठणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

भारत हा पॅरिस कराराअंतर्गत निर्देशांकातले टप्पे वेळेआधीच गाठणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ते आज सीआयआय - आयटीसीच्या शाश्वतता विषयक १९व्या शिखर परिषदेत बोलत होते. शाश्वत पर्यावरणासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे,  त्याअंतर्गत पुनर्वापर आणि पुनर्निमित वापरावर भर दिला जात आहे, यामुळे शाश्वत जीवनशैलीचा मार्ग प्रशस्त होईल असं ते म्हणाले. प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार असून, शाश्वतता हा त्यातला मुख्य घट...