October 28, 2025 2:44 PM

views 16

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी -अश्विनी वैष्णव

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी १ अब्ज ८० कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगत वैष्णव यांनी नॅशनल डेली या दैनिकातला एक लेख समाज माध्यमावर  सामायिक केला. देशभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं उत्पादन सुरु झाल्यानं हजारो रोजगार निर्माण होतील, असंही ते म्हणाले.

October 25, 2025 8:28 PM

views 19

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल-वैष्णव

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या  सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत  होते.    सर्व्हरसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकांसाठी ऊर्जा कार्यक्षम मायक्रो-प्रोसेसर विकसित करणार असून त्यासाठी  सरकार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. चित्रफीती  किंवा ऑनलाईन सामुग्रीची सत्यता पडताळ्यासाठी, त्यातलं ...

January 26, 2025 8:07 PM

views 17

मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित विशेष पाहुण्यांशी संवाद

७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथे संवाद साधला. या सर्व पाहुण्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमातून समाजासाठी अथकपणे काम करत असल्याचा उल्लेख केला असं वैष्णव यांनी आकाशवाणी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. तसंच प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमात सहभागी होण्याच्या अनुभवाविषयीही पाहुण्यांनी सांगितल्याचं वैष्णव म्हणाले. या संवादावेळी प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आ...

July 5, 2024 7:49 PM

views 27

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी ते बोलत होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गाला सोयी देणे याकडे सरकारचा कल आहे, असं सांगत गेल्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी याच उद्देशाने दोन अमृतभारत गाड्यांना हिरवा झ...