September 26, 2024 8:30 PM September 26, 2024 8:30 PM
11
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही – गृहमंत्री अमित शहा
जम्मू काश्मीरमधला दहशतवाद गाडून टाकण्यात आला असून आता दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ते आज जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चेनानी इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत बोलत होते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्दबातल करून ज्येष्ठ नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं, असं शहा म्हणाले. शहा यांनी उधमपूरसह कठुवा आणि जम्मू जिल्ह्यातल्या पाच प्रचारसभांना संबोधित केलं. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप...