September 16, 2025 2:59 PM September 16, 2025 2:59 PM

views 18

सुरक्षित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं गरजेचं-गृहमंत्री

२०४७ पर्यंत विकसित आणि सुरक्षित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवणं अतिशय गरजेचं आहे, असं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी कृतिदल प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते.   अंमली पदार्थांविरोधात व्यापक मोहीम उघडण्याचं आवाहन त्यांनी केलं. फक्त अंमली पदार्थविरोधी ब्युरो आणि गृहमंत्रालय नाही, तर याच्याशी संबंंधित केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे विभ...

July 4, 2025 8:42 PM July 4, 2025 8:42 PM

views 12

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं केलं अनावरण.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांच्या हस्ते शिल्पकार विपुल खटावकर आणि स्थापत्यकार अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला. पेशवा बाजीराव स्मारकची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ह...

June 16, 2025 1:24 PM June 16, 2025 1:24 PM

views 8

भारत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या दहा वर्षात भारताने आपली कार्यक्षमता, वेग आणि अचूक व्यवस्थापन यांच्या बळावर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतकार्य आयुक्त आणि आपत्ती प्रतिसाद दलांच्या परिषदेला संबोधित करत होते.   विविध प्रकारच्या संकटांमध्ये बचावकार्य करण्यासाठी जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन योजना असणं महत्त्वाचं आहे, असं सांगताना विविध राज्यांच्या मदतकार्य आयुक्तांना पुढच्या ९० ...

April 12, 2025 7:13 PM April 12, 2025 7:13 PM

views 2

चित्रलेखा साप्ताहिकाने आपल्या पत्रकारितेतून देशातल्या समस्यांवर प्रकाश टाकला-अमित शहा

चित्रलेखा साप्ताहिकाने आपल्या पत्रकारितेतून देशातल्या समस्यांवर प्रकाश टाकला असून देशाच्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  केलं. चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चित्रलेखानं समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं असंही शहा म्हणाले.    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी चित्रलेखाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आणि चित्रलेखा मराठी साप्ताहिक पुन्हा सुरू करावं अशी विनंती...

March 30, 2025 8:40 PM March 30, 2025 8:40 PM

views 12

बिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक

बिहारमधे यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा, जनतादल संयुक्त, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बिहार विधानसभेत यावेळी २२५ जागा मिळवण्याचं उद्दिष्ट रालोआनं निश्चित केलं असून त्या दृष्टीनं रणनीती आखण्यावर या बैठकीत ...

January 3, 2025 10:27 AM January 3, 2025 10:27 AM

views 11

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले. धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक ...

December 22, 2024 7:55 PM December 22, 2024 7:55 PM

views 8

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्रिपुरामध्ये ६६८ कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरामध्ये ६६८ कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. भाजपा त्रिपुरामध्ये सत्तेत आल्यानंतर ब्रु समुदायाच्या ४० हजार लोकांचं पुनर्वसन झाल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. ब्रु समुदायाच्या प्रश्नांकडे आधीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने लक्ष दिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. ब्रु समुदायातल्या लोकांना अनेक वर्षं मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित  राहावं लागलं. नव्या वसाहतीमुळे त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी, शौचालय, वीज जोडणी, शिक्षण अशा सुविधा मिळाल्या आहे...

December 16, 2024 6:44 PM December 16, 2024 6:44 PM

views 12

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधे बस्तरच्या विभागीय मुख्यालयात, जगदलपूर इथं शहीद सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय, आदिवासी व्यवहार आणि ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे एक विशेष योजना तयार करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

October 7, 2024 6:55 PM October 7, 2024 6:55 PM

views 17

नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा – गृहमंत्री अमित शाह

नक्षलवादाने कोणाचंही भलं झालेलं नाही. नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  नवी दिल्लीत झाली, त्यानंतर ते बोलत होते. नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च २०२६ पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,...

October 1, 2024 6:47 PM October 1, 2024 6:47 PM

views 7

विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल – गृहमंत्री अमित शहा

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. कुठल्याही सर्व्हेचा विचार करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं.  प्रदेश भाजपा निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्यरितीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मतदानाचं प्रमाण १० टक्क्यांनी वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. संध्याकाळी त्य...