November 1, 2025 10:08 AM November 1, 2025 10:08 AM
33
पोलीस दलांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं जाहीर, महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं काल जाहीर करण्यात आली. एकंदर 1 हजार 466 पोलीस कर्मचाऱ्यांना ही पदकं जाहीर झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नऊ जणांचा समावेश आहे. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा, न्यायवैद्यक विज्ञान आदी चार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस यंत्रणांतील कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. तपास विभागात पोलिस निरीक्षक भगवान नारोडे, पल्लवी चव्हाण, उपविभागीय अधिकारी गणपत पिंगळे, किशोर काळे, शर्मिष्ठा वालावलकर, सहा...