August 23, 2024 8:06 PM August 23, 2024 8:06 PM

views 3

नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टलचा केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते आरंभ

देशात नोंदणी करण्यास पात्र ठरणाऱ्या सर्व  MBBS डॉक्टरांकरता नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टलचा आरंभ आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते करण्यात आला. या पोर्टलमुळे देशभरातल्या, ऍलोपॅथी उपचारपद्धतीचा अवलंब करणाऱ्या डॉक्टरांची माहिती एकत्रितपणे मिळणं शक्य होईल ,असं नड्डा म्हणाले.