November 7, 2025 10:26 AM November 7, 2025 10:26 AM
34
भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन
भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे; आणि या संदर्भात काम सुरू झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांनी केलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं, काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारनं २०१४ पासून व्यवसाय सुलभतेसाठी असंख्य सुधारणात्मक उपाययोजना केल्या असून, धोरणात्मक सातत्य आणि पारदर्शकतेमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. वस्तू आणि सेवा करात करण्यात आले...