September 2, 2024 4:06 PM

views 7

केंद्रीय मंत्रीमंडळाची डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज ही बैठक झाली. यासाठी २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यामुळं नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.

August 24, 2024 7:58 PM

views 10

केंद्रीय मंत्रीमंडळाची UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज UPS अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. NPS अर्थात नवीन निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत असलेल्या केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले तर ही संख्या ९० लाखांनी वाढतील, अशी माहिती माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत दिली. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या ...

June 19, 2024 8:53 PM

views 13

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं. यामुळं शेतकऱ्यांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं ते म्हणाले.   वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी...