November 13, 2025 1:26 PM

views 15

नवीन पत हमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजूर देण्यात आली. या योजने अंतर्गत २० हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. याशिवाय सिझियम, ग्रेफाइट, रुबिडियम आणि झिरकोनियम या खनिजांसाठी रॉयल्टी दरांचं सुसूत्रीकरण करणं तसंच, २५ हजार ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या निर्यात प्रोत्साहन अभियानाला मंजुरी देण्यात आली...

November 13, 2025 9:11 AM

views 39

दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव

केंद्रीय मंत्रीमंडळाने दिल्लीत झालेल्या कारस्फोटातील जीवितहानीबद्धल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशाच्या नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ संकल्पाला मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा मान्यता दिली.   केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं या भ्याड हल्ल्याचा...

August 27, 2025 8:14 PM

views 6

पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरीक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना १० ऐवजी १५ हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना २० हजार ऐवजी २५ हजार रुपये कर्ज मिळेल. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र ५० हजार रुपयेच कर्ज दिलं जाईल. या पुनर्रचनेमुळे ५० लाख नव्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. आणखी अनेक शहरं आणि गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवली आ...

August 12, 2025 7:48 PM

views 15

चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या ४ हजार ५९४ कोटी रुपयांच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला.   सेमिकंटक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी सरकार एक बळकट परिसंस्था तयार करत आहे, असं वैष्णव यावेळी म्हणाले. गेल्या अकरा वर्षात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा टक्के वाढ झाली असून निर्य...

July 2, 2025 9:22 AM

views 13

रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या रोजगार-संबंधित प्रोत्साहन योजनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. दोन वर्षांच्या कालावधीत देशात साडेतीन कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याकरता प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यापैकी सुमारे दोन कोटी लाभार्थी हे पहिल्यांदाच कामाची सुरवात करणार आहेत. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना या योजनेचे फायदा होणार आहे. उत्पादन क्षेत्रातील संस्थांना याकरता अनुदान दिलं जाणार असून य...

January 2, 2025 9:51 AM

views 11

वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. डीएपी, अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा तसच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीकविमा योजनेला 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना याबद्दल मा...

October 4, 2024 3:08 PM

views 14

तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार १०३ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजुरी

देशातली प्रमुख बंदरं आणि गोदी कामगार मंडळाचे कर्मचारी आणि कामगारांसाठी उत्पादकतेशी संलग्न मोबदला योजनेत सुधारणा लागू करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही सुधारणा वर्ष २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेमुळे सुमारे २० हजार ७०४ कर्मचारी आणि कामगारांना लाभ मिळणार आहे. बंदर निहाय कामगिरीला असलेलं महत्त्व ५० टक्के वरून वाढवून आधी ५५ टक्के आणि त्यानंतर ६० टक्के इतकं वाढवून वार्षिक तत्त्वावर हा मोबदला दिला जाईल. २०२४-२५ ते २०३०-३१ या ७ वर्षांसाठी तेलबिया आणि खाद्यतेल निर्...

October 4, 2024 12:13 PM

views 12

कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद अससेल्या दोन योजनांना केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजुरी

शाश्वत कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्नसुरक्षेसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने कृषि उन्नती योजना अशा दोन योजनांना केंद्रिय मंत्रीमंडळाने काल मंजुरी दिली. या दोनही योजनांसाठी एकंदर 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं आणि मध्यम वर्गीयांना अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या योजना आधारस्तंभ ठरतील असं ते म्हणाले. उर्जा क्षेत्रातील शाश्वत हरित विकास आणि कार्बन व...

September 19, 2024 9:36 AM

views 14

एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या

एक देश एक निवडणूक या संकल्पनेची वास्तविकता पडताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं विविध राजकीय पक्ष आणि तज्ञांसह संबंधितांशी देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केल्याचंही वैष्णव या...

September 2, 2024 6:54 PM

views 16

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. महाराष्ट्रतले २ आणि मध्यप्रदेशातले ४ जिल्हे यातून जोडले जाणार आहे. या मार्गावर ३० रेल्वे स्थानकं असतील, यामुळं १ हजार गावांना आणि ३० लाख नागरिकांना याचा ...