February 7, 2025 8:21 PM February 7, 2025 8:21 PM

views 12

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरु, हा अर्थसंकल्प कृषीआव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका, तर गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला.   एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. तर भाजपाचे राव राजेंद्र सिं...

February 3, 2025 9:03 PM February 3, 2025 9:03 PM

views 9

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २३८०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार या प्रकल्पांमधला राज्याचा वाटा रिझर्व्ह बँक उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातली नवी १३२ स्थानकं विकसित के...

July 25, 2024 8:18 PM July 25, 2024 8:18 PM

views 24

राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शेतकरी, गरीब आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसून, सरकार अन्नधान्यावर पुरेसं किमान आधारभूत मूल्य देत नसल्याचं ते म्हणाले.   सरकारनं या अर्थसंकल्पातून समाजाच्या कोणत्याही घटकाचं समाधान केलं नसल्याची टीका ‘आप’ चे राघव चड्डा यांनी केला. सामान्य माणसावरचा कराचा बोजा वाढला असून ग्रामीण भागातली उत्पन्नाची वाढ दशकभरात सर्वात नीचांक...