February 10, 2025 8:16 PM February 10, 2025 8:16 PM
8
आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा
लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. २०२५-२६ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात कॉरपोरेट्सना झुकतं माप देण्यात आलं असून जनतेच्या बेरोजगारी, महागाई या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा आरोप द्रमुकचे दयानिधी मारन यांनी केला. भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं आजवरची नीचांकी पातळी गाठली आहे, अशी टीका त्यांनी केली. नोटबंदीच्या वेळी जाहीर केलेलं कोणतंही उद्दिष्ट साध्य करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, असं काँग्रेसच्या मनीष तिवारी यांनी सांगितलं. अर...