October 20, 2024 1:17 PM October 20, 2024 1:17 PM
2
‘कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातल्या किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करणार’
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपलं भाजीपाला ५ रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो ५० रुपये किलो भावानं विकला जातो, ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संश...