November 8, 2025 11:40 AM November 8, 2025 11:40 AM

views 39

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी-केंद्रीय कृषी मंत्री

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्‍या करावी लागू नये, हे आपलं उद्दीष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं.   ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं नमूद करत, केंद्र सरकार ग्लोब...

April 17, 2025 1:51 PM April 17, 2025 1:51 PM

views 9

केंद्रीय कृषी मंत्री आज ब्राझीलमध्ये १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत होणार सहभागी

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पाउलो इथे १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल, असं कृषी मंत्रालयाने एका पत्रकात म्हटलं आहे. या दौऱ्यात कृषिमंत्री चौहान, ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावेरो तसेच कृषिविकास आणि कुटुंबशेती मंत्री लुईझ टिकसेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ब्राझीलमधल्या कृषी संलग्न व्यापारात सहभा...

December 7, 2024 11:15 AM December 7, 2024 11:15 AM

views 20

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल – केंद्रीय कृषी मंत्री

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चौहान बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचं सांगून, अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत, 2013-14 च्या तुलनेत आता 1 लाख 22 हजार 528 कोटी रुपयांची अभूतपूर्व वाढ केल्याचं त्यांनी नमूद केलं.