January 27, 2025 2:52 PM January 27, 2025 2:52 PM

views 25

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.  उत्तराखंडचे  मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आज डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन केलं. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, आणि लिव्ह इन नातेसंबंधांसह अनेक बाबींमधे हा कायदा लागू झाला आहे.