December 10, 2025 1:36 PM December 10, 2025 1:36 PM
11
नेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश
भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. ही बातमी समजल्यावर देशात आणि जगभरातल्या भारतीय समुदायात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दीपावली हा केवळ सण नाही तर आपल्या संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज...