November 27, 2025 1:16 PM

views 59

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण

पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि संकल्पनांनी अगणित लोकांच्या जीवनात शक्ती आणि आशा निर्माण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

November 1, 2025 3:03 PM

views 55

‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमध्ये समरकंद इथं झालेल्या ४३ व्या सर्वसाधारण बैठकीत युनेस्कोनं लखनौ शहराला ‘गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत मान्यता दिली.   यामुळे लखनौला जगभरातल्या ७० गॅस्ट्रोनॉमी शहरांमध्ये स्थान मिळालं असून, हैदराबादनंतर हा किताब मिळवणारं भारतातलं हे दुसरं शहर ठरलं आहे.

September 18, 2025 8:29 PM

views 51

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या नवी स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स, कर्नाटकमधलं सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय प्रदेश, मेघालयातल्या गुहा, नागा हिल ओफिओलाईट, आंध्र प्रदेशातलं एरा मट्टी दिब्बालू, तिरुमला टेकड्या आणि केरळमधल्या वर्कला इथले उंच कडे यांचा समावेश आहे.    पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपू...

July 12, 2025 3:41 PM

views 37

मराठ्यांच्या १२ गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद

मराठा इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ गड किल्ल्यांना युनेस्को- जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. यामुळे भारतातल्या जागतिक वारसास्थळांची संख्या आता ४४ झाली आहे. जागतिक वारसास्थळं समितीची ४७वी बैठक पॅरिसमधे काल झाली, त्यात हा निर्णय झाला. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसंच तामिळनाडूतला जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निर्णया...

February 24, 2025 1:52 PM

views 9

शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचं नामांकन

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना  जागतिक वारसास्थळ समितीचं आवश्यक नामांकन मिळाल्याचं महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी सांगितलं. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा अंतिम यादीत समावेश व्हावा यासाठी सादरीकरण करण्यासाठी शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरी...

February 23, 2025 1:52 PM

views 16

महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांंच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं.  सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.   राज्य शासनानं 'मराठा लष्करी भूप्रदेश' या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यां...

October 24, 2024 2:34 PM

views 13

भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च, युनेस्कोच्या पाहणीचा निष्कर्ष

चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्य...

October 4, 2024 9:25 AM

views 32

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासंदर्भात युनेस्कोच्या शिष्टमंडळाची रायगडाला भेट

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या पथकानं कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार माहिती घेत...

September 19, 2024 11:40 AM

views 18

युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.   पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

July 27, 2024 8:12 PM

views 23

युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सात नवीन स्थळांचा समावेश

युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आज सात नवीन स्थळांचा समावेश केला आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भरलेल्या ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या सत्रात हा समावेश करण्यात आला. यामध्ये जपानचं सदो बेट सोन्याच्या खाणी, चीनचं बीजिंग सेंट्रल ॲक्सिस, थायलंडचे फु फ्राबट ऐतिहासिक पार्क, रशियाचं केनोझेरो लेक लँडस्केप, केनियाचं ऐतिहासिक शहर आणि गेडीचे पुरातत्व स्थळ, दक्षिण आफ्रिकेतली नेल्सन मंडेला मानवी हक्कांसाठी लेगसी साइट्स, लिबरेशन अँड नॅशनल पार्क्स, लिबरेशन आणि रिकॉन्सिया पार्क  लेणी संकुल,  समित...