September 15, 2025 8:49 PM September 15, 2025 8:49 PM

views 5

ऑगस्टमध्ये पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी

यंदा ऑगस्टमध्ये वय वर्षं १५ आणि त्यावरील पुरुषांमधल्या बेरोजगारीचा दर पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. नियमित सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये ग्रामीण भागातल्या पुरुषांच्या बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. जूनमध्ये एकूण कामगारांमध्ये महिलांमध्ये कामगारांचं प्रमाण ३० टक्के इतकं नोंदवण्यात आलं होतं, ते ऑगस्ट महिन्यात ३२ टक्के इतकं झाल्याचं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटलं आहे.

February 19, 2025 10:11 AM February 19, 2025 10:11 AM

views 5

बेरोजगारीच्या दरात ६.४ टक्क्यांची घट

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत शहरी भागातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या बेरोजगारीच्या दरात ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर ६ पूर्णांक ५ दशांश टक्के होता.