June 24, 2024 8:20 PM June 24, 2024 8:20 PM

views 7

११३ देशांपैकी २६ देशांमध्ये महिला राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत – संयुक्त राष्ट्र

जगभरातल्या देशांमध्ये महिलांची राजकीय क्षेत्रातली संख्या समाधानकारक नसल्याचं संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. जगातल्या ११३ देशांपैकी फक्त २६ देशांमध्ये महिला राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. २३ टक्के महिला या देशांमध्ये महत्त्वाच्या राजकीय पदांवर आहेत. तर १४१ देशांमध्ये फक्त तीन पदांवरच महिला नेत्या आहेत. जगातल्या ७ देशांच्या मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.