November 25, 2025 8:18 PM November 25, 2025 8:18 PM

जगात दर १० मिनिटांनी एक महिला किंवा मुलीची हत्या, संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जगात दर १० मिनिटांनी एक महिला किंवा मुलीची हत्या होत असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलं आहे. आजचा दिवस महिलांवरच्या अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी घोषित केलेला जागतिक दिन असून त्यानिमित्त हा अहवाल प्रकाशित केला आहे. २०२४ या वर्षात जगभरात सुमारे ८३ हजार महिला किंवा मुलींची हत्या करण्यात आली. त्यातल्या ६० टक्के आपल्याच कुटुंबियांच्या हल्ल्याला बळी पडल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर पाळत, धमक्या देणं, चित्रांचा वापर करून छळणं अशा प्रकारचा हिंसाचार वाढला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे...