November 11, 2025 1:38 PM November 11, 2025 1:38 PM

views 11

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांना विनंती

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारातानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश म्हणाले. गैर राज्यसंस्था गटांना आणि दहशतवादी संघटनांना शस्त्र पुरवठा होणं हा जागतिक धोका असून याचा सामना एकत्रितपणे केला पाहिजे असं ते म्हणाले.

July 15, 2025 8:04 PM July 15, 2025 8:04 PM

views 8

शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी केवळ ३५ % उद्दिष्ट २०३० सालापूर्वी पूर्ण होऊ शकतील, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची स्पष्टोक्ती

शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी केवळ ३५ टक्के उद्दिष्ट २०३० सालापूर्वी पूर्ण होऊ शकतील असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते शाश्वत विकास उद्दिष्ट २०२५ अहवालाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. शाश्वत विकास उद्दिष्ट मुदतीमध्ये पूर्ण करण्यात आलेलं अपयश जागतिक विकासातली आणीबाणीची परिस्थिती दर्शवत असल्याचं त्यांनी  यावेळी सांगितलं.    जगातले ८०० दशलक्ष पेक्षा जास्त लोक आजही अत्यंत गरिबीत असून जवळजवळ १८ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आपण मागे राहिल्याचं ते म्हणाले. हवामान बदल,...

August 6, 2024 1:40 PM August 6, 2024 1:40 PM

views 8

बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी

बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लष्करी विमानातून देश सोडला. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये शांतता आणि लोकशाही कायम राहायला हवी, असं युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी काल सांगितलं. बांगलादेशात गेल्या दोन आठवड्यांमध्ये अभूतपूर...

June 26, 2024 3:18 PM June 26, 2024 3:18 PM

views 10

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सदस्य संख्येत वाढ करण्याची भारताची मागणी

    सध्याची जागतिक आव्हानं प्रभावीपणे पेलण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या  सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्य संख्येत वाढ करून सुरक्षा परिषदेत सुधारणा करायला हव्यात, अशी मागणी भारतानं केली आहे. पुढच्या वर्षी  संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला  ८० वर्ष पूर्ण होत  असून सुधारणांसाठी हीच योग्य वेळ असल्याचं भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथुर यांनी सांगितलं.     सुरक्षा परिषदेवरच्या वार्षिक अहवालावर आमसभेत झालेल्या चर्चदरम्यान त्यांनी भारताची भूमिका मांडली. सध्या १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिय...