November 15, 2024 8:15 PM November 15, 2024 8:15 PM

views 12

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात १ ठार, ८ जखमी

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला आणि इतर आठ जण जखमी झाले. रशियाची २१ ड्रोन्स पाडल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. तर युक्रेनच्या वोझनेसेंका गावावर ताबा मिळवल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.

November 10, 2024 8:02 PM November 10, 2024 8:02 PM

views 28

रशिया आणि युक्रेनकडून परस्परांवर ड्रोनचा बेछूट मारा

रशिया आणि युक्रेन यांनी काल रात्रभर परस्परांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. काल रात्री रशियानं एकूण १४५ ड्रोन्स सोडले. एकाच रात्रीतला हा सर्वात मोठा ड्रोनचा मारा होता. आज सकाळी युक्रेननं मॉस्कोवर ३४ ड्रोन्सचा मारा केला. २०२२ मधे हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियावर राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोनहल्ला आहे. या हल्ल्यामुळे मॉस्कोमधल्या तीन प्रमुख विमानतळांवरची वाहतूक इतरत्र वळवावी लागली. आता वाहतूक सुरळीत असल्याचं रशियाच्या हवाई वाहतूक निरीक्षक संस्थेनं म्हटलं आहे. या ड्रोन हल्ल्यात एकजण ...

September 26, 2024 2:05 PM September 26, 2024 2:05 PM

views 16

युक्रेनला अण्वस्त्र पुरवणारा देश युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा

रशिया विरुद्धच्या युद्धात यूक्रेनला अण्वस्त्र पुरवल्यास संबंधित देशही त्या युद्धात सहभागी असल्याचं मानलं जाईल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. मॉस्को इथं काल झालेल्या रशियाच्या सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. यूक्रेनने या युद्धात लांब पल्ल्याच्या पाश्चात्त्य क्षेपणास्त्रांचा वापर करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमधल्या आपल्या मित्र राष्ट्रांकडून परवानगी मागितली आहे, असं यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

September 21, 2024 12:15 PM September 21, 2024 12:15 PM

views 24

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळली

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तर देताना सांगितलं की, अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की, भारतानं आजवर लष्करी आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीसंदर्भात आंतरराष्ट्रीय दायित्वांचं पालन अतिशय शुद्ध पद्धतीनं केलं आहे.

September 15, 2024 3:11 PM September 15, 2024 3:11 PM

views 20

रशिया आणि युक्रेननं संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले

रशिया आणि युक्रेननं त्यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले आहेत. कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या एकशे तीन रशियन सैनिकांची, एकशे तीन युक्रेनियन युद्धकैद्यांच्या बदल्यात सुटका करण्यात आली आहे, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. युनायटेड अरब अमिरातने युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी मध्यस्थी केली आहे.  

August 27, 2024 9:28 AM August 27, 2024 9:28 AM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात युक्रेन आणि बांगलादेशातल्या परिस्थितीवर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यो बायडन यांनी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल प्रधानमंत्री मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी लोकशाही, कायद्याचं राज्य या समान मूल्यांवर आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर दृढ संबंधांवर आधारित आहे. या चर्चेवेळी मोदी आणि बायडन यांनी द्विपक्षी संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगती...

July 12, 2024 10:33 AM July 12, 2024 10:33 AM

views 32

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा नाटोचा आरोप

युक्रेन रशिया संघर्षात चीननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आरोप नाटोनं केला आहे. सायबर विश्वात सुरू असलेल्या चीनच्या कुरापती तसंच चीनचा आण्विक क्षमतेचा वेगवान विस्तार या चिंता आणि भीती निर्माण करणाऱ्या घटना असून जागतिक सुरक्षेसाठी हे आव्हान असल्याचं नाटोनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आयोजित केलेल्या शिखर परिषदेत चीनचा निषेध करणारं संयुक्त घोषणापत्र जारी करण्यात आलं.