December 28, 2025 1:59 PM December 28, 2025 1:59 PM

views 42

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

रशिया आणि युक्रेनमधला वाढत तणाव, आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरु असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत २० कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमीवर चर्चा होईल. युक्रेन मधल्या कीव शहरावर काल रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर शहराच्या अनेक भागातली वीज आणि हीटिंग सेवा खंडित झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे.  &nbsp...

December 19, 2025 1:44 PM December 19, 2025 1:44 PM

views 10

युक्रेनला कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांची सहमती

युक्रेनला ९० अब्ज युरो कर्ज देण्यावर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी सहमती दर्शवली  आहे. युक्रेनला साहाय्य करण्यासाठी रशियाच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर करण्यावर  सहमती न झाल्यामुळे युरोपियन युनियननं या निर्णयाला अर्थसंकल्पीय समर्थन दिलं. ब्रुसेल्स इथल्या  शिखर परिषदेत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ही कर्जाची रक्कम पुढली दोन वर्ष युक्रेनची लष्करी आणि आर्थिक गरज पूर्ण करेल असा युरोपियन युनियनचा अंदाज आहे. 

October 25, 2025 6:28 PM October 25, 2025 6:28 PM

views 52

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलं जाहीर

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. युक्रेननं रोस्तोव्ह, वोल्गोग्राड, ब्रायन्स्क, कलुगा, स्मोलेन्स्क, बेल्गोरोड, मॉस्को, वोरोनेझ, लेनिनग्राड, नोव्हगोरोड, रियाझान, तांबोव, टव्हर आणि तुला या भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. मात्र रशियाच्या संरक्षण दलानं काल रात्री ते यशस्वीपणे परतवून लावल्याचं यात म्हटलं आहे.    दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यां...

October 6, 2025 8:17 PM October 6, 2025 8:17 PM

views 52

रशिया आणि युक्रेनच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित

रशिया आणि युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधल्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे रशियातील बेल्गरोद प्रदेशात वीजपुरवठा खंडित झाला, याचा फटका जवळपास ४० हजार नागरिकांना बसला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जनरेटर लावावं लागलं, असंख्य लोक जखमी झाले. दुसरीकडे रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधल्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला.

October 4, 2025 8:01 PM October 4, 2025 8:01 PM

views 40

युक्रेनमधे एका प्रवासी रेल्वेवर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुमारे 30 जण जखमी

युक्रेनच्या उत्तरेकडे सुमी प्रदेशातल्या शोस्तका इथं एका प्रवासी रेल्वेवर रशियाने ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 30 लोक जखमी झाले असल्याचं प्रादेशिक गव्हर्नर ओलेह ह्रीहोरोव्ह यांनी आज सांगितलं. ते म्हणाले की हा हल्ला शोस्तकाहून राजधानी कीएवकडे जाणाऱ्या ट्रेनवर झाला. डॉक्टर आणि बचावकर्ते घटनास्थळी काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मॉस्कोने युक्रेनच्या रेल्वेवर आपले हवाई हल्ले वाढवले ​​आहेत, गेल्या दोन महिन्यांत दररोज त्यावर हल्ला होत आहे, असंही ते म्हणाले.

August 29, 2025 10:59 AM August 29, 2025 10:59 AM

views 28

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर मृतांची संख्या 23वर

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर कीवमधील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून किमान 48 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिल मुख्यालयासह सात जिल्ह्यांमधील अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. बचाव पथकं, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.   दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियानं केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता; असं कीवच्या हवाई दलाने म्हटलं आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की...

August 27, 2025 7:55 PM August 27, 2025 7:55 PM

views 6

रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला

रशियानं युक्रेनच्या सहा भागांमधल्या ऊर्जा आणि गॅस क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात पोल्टावा भागातल्या गॅस वाहतूक आस्थापनेचं मोठं नुकसान झाल्याचं, तर सुमी भागात एका महत्त्वाच्या उपकेंद्रातल्या यंत्रसामग्रीलाही फटका बसल्याचं वृत्त आहे.   या हल्ल्यांमुळे पोल्टावा, सुमी आणि चर्नीहिव भागात वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे.  

June 7, 2025 1:27 PM June 7, 2025 1:27 PM

views 51

रशियानं युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात 3 ठार, २१ जण जखमी

युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर रशियानं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान ३ जण ठार, तर २१ इतर जखमी झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांतला रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. यात १८ इमारती आणि १३ घरांचं नुकसान झालं आहे.

May 24, 2025 2:28 PM May 24, 2025 2:28 PM

views 29

रशिया आणि युक्रेनकडून प्रत्येकी ३९० कैदी मुक्त

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आतापर्यंत प्रत्येकी ३९० कैद्यांना मुक्त केलं आहे. या युद्धात कैद्यांची ही  सर्वात मोठी सुटका मानली जात आहे. इस्तंबूल इथं दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर एक सामंज्यस्य करार झाला असून आगामी काळात दोन्ही देशांकडून आणखी काही कैद्यांची सुटका होणार असल्याची शक्यता आहे.   सुटका केलेल्या युक्रेनियन कैद्यांना उत्तर चेर्रनिव्हिव्ह इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रशियाचे सुटका केलेले कैदी सध्या बेलारुसमध्ये असून त्यांना रशियामध्ये हलवण्यापूर्वी व...

May 20, 2025 10:03 AM May 20, 2025 10:03 AM

views 19

रशिया-युक्रेन युध्दबंदीसाठीच्या चर्चेला अमेरिका तयार

रशिया आणि युक्रेनदरम्यान लवकरच युध्दविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युध्द संपेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजामाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या बरोबर दुरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीही आपण युक्रेनसोबत संभाव्य शांतता करारावर काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. रशियानं बिनशर्त युद्धबंदी करावी असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झ...