July 24, 2025 8:31 PM July 24, 2025 8:31 PM

views 13

भारत- युके मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या

भारत- युके दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबरची बैठक संपल्यावर संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. या करारामुळे भारतीय वस्त्रं, पादत्राणं, मौल्यवान रत्नं, मासळी, प्रक्रीया केलेले खाद्यपदार्थ आणि अभियांत्रिकी उपकरणांना युकेमधली बाजारपेठ खुली होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कराराबद्दल समाधान व्यक्त केलं   युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर युकेच्या दृष्टीनं भारताबरोबरचा मुक्त व्यापार करार हा महत्त्...

May 6, 2025 7:57 PM May 6, 2025 7:57 PM

views 20

भारत आणि युके यांच्यात मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार

भारत आणि युके नं महत्त्वाकांक्षी आणि परस्पर लाभदायक मुक्त व्यापार करारासोबतच दुहेरी योगदान करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युके चे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबर चर्चा केली. या ऐतिहासिक करारांमुळे दोन्ही देशातली धोरणात्मक भागिदारी, व्यापार, गुंतवणूक, विकास, रोजगार निर्मिती आणि नवोन्मेषाला चालना मिळेल, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्टार्मर यांचं भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असंही  मोदी यांनी म्हटलं आहे.

August 6, 2024 7:53 PM August 6, 2024 7:53 PM

views 4

भारतीय दूतावासाकडून युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

युनायटेड किंगडमच्या काही भागांत झालेली हिंसक आंदोलनं आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधल्या भारतीय दूतावासानं युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युकेच्या साऊथ पोर्ट भागात हिंसाचारामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हल्लेखोरांबद्द्दल चुकीची माहिती प्रसारित झाल्यामुळे काही ठिकाणी स्थलांतर विरोधी हिंसक निदर्शनं झाली. या पार्श्वभूमीवर युकेला भेट देणाऱ्या भारतीय प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी असं भारतीय दूतावासानं  म्हटलं आहे. 

July 5, 2024 8:36 PM July 5, 2024 8:36 PM

views 21

प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचा राजीनामा

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनी पदाचा राजीनामा दिला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची जबाबदारी घेत सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.   प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनक यांनी मनोगत व्यक्त केलं.हुजूर पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याबद्दल सुनक यांनी समर्थकांची माफी मागितली.तसंच २०१० च्या तुलनेत गेल्या १४ वर्षांत ब्रिटन समृद्ध, निःपक्ष आ...