August 28, 2025 3:16 PM

views 13

५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट्स पूर्ण करण्याचे आदेश

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं देशभरातल्या शाळांना पाच ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे.   प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित करण्याची विनंती केली.   प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे देशभरातल्या १७ कोटी बालकांची बायोमेट्रिक्स माहिती ताजी करणं सोपं होईल अशी अप...

July 16, 2025 9:21 AM

views 16

७ वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करण्याचे UIDAI कडून पालकांना आवाहन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) पालकांना ७ वर्षे आणि त्यावरील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला विकासात्मक कारणांमुळे बोटांचे ठसे किंवा बुबुळ स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. मात्र एकदा मूल पाच वर्षांचे झाले की, हे बायोमेट्रिक्स अपडेट करणे आवश्यक आहे   आणि जर ते ५ ते ७ वयोगटातील असेल तर ही प्रक्रिया मोफत आहे. जर ७ वर्षांच्या वया...

June 14, 2025 7:48 PM

views 11

UIDAI नं आधार कार्ड निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड  निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत होती. आता ती १४ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. यूआयडीएआयनं आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवर माहिती दिली आहे. ज्या व्यक्तींचे आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्याहून अधिक जुनं आहे, त्यांना ते अद्ययावत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसं न केल्यास त्या व्यक्तीचं आधार कार्ड रद्द होऊ शकते. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा असलेले कागदपत्र सोबत नेणं बंध...