April 5, 2025 3:58 PM April 5, 2025 3:58 PM

views 8

परदेशी शिक्षणानंतर भारतात उच्च शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

परदेशी शिक्षण घेऊन नंतर पुन्हा भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानकीकरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष मामिदला जगदेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की परदेशी शिक्षणसंस्थांमधून घेतलेल्या पदव्या, पदविका आणि इतर पात्रता प्रमाणपत्रांना मान्यता देऊन, भारतातल्या शिक्षणसंस्थांच्या परिप्रेक्ष्यात त्यांचं मानकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित आणि पारदर्शी पद्धत आयोगाने विकसित केली आहे.  

December 11, 2024 9:43 AM December 11, 2024 9:43 AM

views 15

CUET-UG या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत बदल

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात (UGC)नं पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी (CUET-UG) या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल करत असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल दिली. पुढील वर्षापासून CUET-UG साठी इयत्ता 12 वी मध्ये कोणत्याही विषयांत शिकत असलेल्या विद्यार्थाला ही परिक्षा देता येणार आहे. यापुर्वी विज्ञान शाखेतील अनिवार्य विषयांसह ही परिक्षा देता येत होती. CUET-UG आता फक्त संगणक आधारित चाचणी होईल. CUET-UG पुढील सत्रापासून ३७ ऐवजी ६३ विषयांमध्ये घेण्या...

June 15, 2024 1:23 PM June 15, 2024 1:23 PM

views 12

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे.    विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर यूजीसीनं ही उपाययोजना केली आहे. केंद्र किंवा राज्य सरका...