March 20, 2025 10:21 AM March 20, 2025 10:21 AM

views 8

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानात उद्यम उत्सवाचं आयोजन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान इथं आयोजित उद्यम उत्सवात सहभागी होणार आहेत . केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने याचं आयोजन केल असून, या उद्योगांतून तयार होणाऱ्या भारतीय पारंपरिक वस्तूंच्या उत्पादनांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देणं, हा या उत्सवामागचा उद्देश आहे.   यामध्ये, महिला स्वयं सहाय्यता गट, प्रधानमंत्री विश्वकर्मा आणि आदिवासी योजनेतील लघु उद्योजक तसच खादी आणि इतर ग्रामीण लघु उद्योजक यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच प्रदर्शन...