September 4, 2024 8:07 PM September 4, 2024 8:07 PM

views 13

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक – राष्ट्रपती

  प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून, त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रीय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं त्या म्हणाल्या. राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं, आ...