July 5, 2025 7:30 PM July 5, 2025 7:30 PM

views 25

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयी मेळाव्यात मराठी ऐवजी सरकार गेल्याचं दुःख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्ता असताना ते काहीही करू शकले नाही. तरी त्यांना पुन्हा सत्ता हवी असल्याचं फडणवीस म्हणाले. दोन्ही भावांना एकत्र आणल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

June 29, 2025 8:47 PM June 29, 2025 8:47 PM

views 6

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं – नेते उद्धव ठाकरे

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं. यासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणतीही समिती नेमली, तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी एखादं संकट यायची वाट पाहू नये. ही जाग कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला होणारा मोर्चा रद...

March 27, 2025 3:31 PM March 27, 2025 3:31 PM

views 19

महायुतीच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प असल्याचं ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.   सरकार स्थापनेवेळी १०० दिवसांचा आराखडा मांडण्यात आला होता. त्या आराखड्यापैकी एकही गोष्ट या अर्थसंकल्पात आली नसल्याची टीका ठाकरे यांनी केली.

August 17, 2024 10:12 AM August 17, 2024 10:12 AM

views 12

घटकपक्षांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्यास आपला पाठिंबा – उद्धव ठाकरे

राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपला त्याला पाठिंबा आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.