August 6, 2024 6:09 PM August 6, 2024 6:09 PM

views 13

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं.  न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणात वर्गवारी करण्याची सूचना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनाबाह्य स्वरूपाचं सरसकट आरक्षण देणं अयोग्य आहे, शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेल्या आरक्षण प्रणाल...

July 30, 2024 7:25 PM July 30, 2024 7:25 PM

views 8

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. धारावीतल्या रहिवाशांना ...

July 21, 2024 6:43 PM July 21, 2024 6:43 PM

views 13

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. मदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग...

July 20, 2024 7:14 PM July 20, 2024 7:14 PM

views 9

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.   धारावीकरांना त्यांच्या हक्काचं ५०० चौरस फुटांचं हक्काचं घर तिथेच मिळायला पाहिजे, ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. अदानी समूहाला वारेमाप एफएसआय दिला जात असून समूहाला दिलेल्या निविदेत वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. धारावीकरांना धारावीतून हाकलून लावण्याचा, नागरी संतुलन बिघडवण्या...

July 7, 2024 7:43 PM July 7, 2024 7:43 PM

views 12

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई – उद्धव ठाकरे

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते.    गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी केली. एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकजुटीनं आपल्या मागण्या केंद्राकडून पूर्ण करून घेण्याचं...

July 7, 2024 3:14 PM July 7, 2024 3:14 PM

views 11

राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ – उद्धव ठाकरे

राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी दिली नाही,  आरक्षणावर तोडगा काढला नाही, अशी टीका त्यांनी केली.