November 4, 2024 7:18 PM

views 19

मविआत जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली असून उरणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल, तर अलिबाग, पेण आणि पनवेलमधून शेकापचे उमेदवार निवडणुकीत उतरतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

October 24, 2024 7:03 PM

views 23

माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

October 22, 2024 7:04 PM

views 22

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी माजी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं.  

October 8, 2024 7:07 PM

views 11

राज्यात मविआचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल ते जाहीर करावं – उद्धव ठाकरे

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल ते जाहीर करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईत आयोजित वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा आपण त्याला पाठिंबा देऊ असं ते म्हणाले.

October 8, 2024 3:59 PM

views 27

सवलती देऊन नागरिकांच्या समस्या दूर होणार नाहीत – उद्धव ठाकरे

राज्यात महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्या आहे. छोट्या मोठ्या सवलती देऊन नागरिकांच्या या समस्या दूर होणार नाही, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईत आयोजित राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. त्यांच्या कर्मकांडाला विरोध म्हणून साथ सोडली असं ते म्हणाले.  

September 15, 2024 8:14 PM

views 29

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिर्डी इथं पेन्शन राज्य महाअधिवेशनात बोलत होते.  या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि इतर नेते  उपस्थित होते. पटोले यांनीही त्यांच्या भाषणात हे आश्वासन दिलं. जुनी पेन्शन योजना काँग्रेसच्या काळात सुरु होती, ती अटल बिहारी वाजपेयी सरकारनं बंद केली. आणि आता भाजपा काँग्रेसवर आरोप करत आहे. पण काँग्रेसचं सर...

August 28, 2024 3:35 PM

views 44

महाविकास आघाडी येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार

राजकोट किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतर्फे आज मालवणात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळण्याची घटना क...

August 23, 2024 3:48 PM

views 26

महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन – उद्धव ठाकरे

बदलापूरमध्ये दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळणार असून या बंददरम्यान रुग्णवाहिका, वृत्तपत्रं, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

August 22, 2024 1:15 PM

views 21

महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी बंदचं आवाहन – उद्धव ठाकरे

येत्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबई इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली म्हणण्यात अर्थ नाही. आधी बहीण सुरक्षित असेल तर पुढे लाडकी बहीण वगैरे योजना राबवता येतील, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

August 21, 2024 8:47 AM

views 32

राज्यात शक्ती कायदा आणावा – उद्धव ठाकरे

राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात मसुदा तयार केला, तो या सरकारनं मंजूर करून शक्ती कायदा तयार करावा, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर बदलापूर घटनेतल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.