November 14, 2024 7:08 PM November 14, 2024 7:08 PM

views 14

राज्यात मविआचं सरकार आल्यानंतर जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवले जातील. मुलांना मोफत शिक्षण त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते.    तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे...

November 13, 2024 7:33 PM November 13, 2024 7:33 PM

views 19

विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीची लढाई ही महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गातल्या प्रचारसभेवेळी म्हणाले. सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे आज ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वचननाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

November 12, 2024 6:38 PM November 12, 2024 6:38 PM

views 30

मविआ सत्तेत आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या प्रचारसभेत दिलं. महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नाही. महायुतीकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते दिशाभूल करत असल्याचं सांगत महाविकास आघाडीला सत्ता देण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं.

November 11, 2024 3:26 PM November 11, 2024 3:26 PM

views 11

भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे – उद्धव ठाकरे

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, मात्र भाजपाचे नेते ३७० कलमसारखे मुद्दे मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज वणी मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलत होते. मुंबईसह राज्यभरातले विविध प्रकल्प विशिष्ट उद्योगसमूहाला आंदण दिले जात असून भाजपा हिंदू-मुस्लिम भांडण लावत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

November 10, 2024 6:50 PM November 10, 2024 6:50 PM

views 15

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

राज्यातला शेतकरी शेतमालाला हमीभाव मागत आहे, मात्र भाजपाचे नेते इतर मुद्यांवर बोलून दिशाभूल करत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगोला इथल्या प्रचारसभेत केली. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात मात्र काश्मीरमधले दहशतवादी हल्ले अजूनही थांबले नाहीत, भाजपाच्या नेत्यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा राज्यातल्या निवडणुका जास्त महत्वाच्या वाटतात असं ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पुढची पाच वर्षं जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन त्...

November 9, 2024 4:35 PM November 9, 2024 4:35 PM

views 7

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघात प्रचारसभा

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये मदत देणार, महिलांसाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी असणारी वेगळी पोलीस ठाणी राज्यभरात उभारणार अशी आश्वासनं ठाकरे यांनी या वेळी दिली. महायुतीच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात ...

November 8, 2024 7:03 PM November 8, 2024 7:03 PM

views 11

शिवरायांचा पुतळा उभारताना महायुतीनं भ्रष्टाचार केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुती सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा इथं केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडीनं गेल्या काही काळात विकासकामं केली. पीकविमा, सोयाबीनला भाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, कोरोना काळात औषधं अशी कामं आपल्या सरकारनं केल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

November 6, 2024 3:24 PM November 6, 2024 3:24 PM

views 14

पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू – उद्धव ठाकरे

आपलं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचं नुकसान न करता तेल, डाळ, साखर, तांदूळ, गहू या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षं स्थिर ठेवून दाखवू, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रत्नागिरी इथं काल संध्याकाळी त्यांची सभा झाली. आपलं सरकार आलं, तर बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करू असं आश्वासनही त्यांनी या सभेत बोलताना दिलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण, ...

November 5, 2024 8:32 PM November 5, 2024 8:32 PM

views 54

महाविकास आघाडीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आज घेतलेल्या प्रचार सभेत पाच आश्वासन मतदारांना देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं.    महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. विद्यार्थींनीबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, महिला पोलिसांची भरती केली जाईल तसंच महिला पोलिस कर्मचारी असलेली पोलिस ठाणी राज्यात सुरू केली जातील. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरं दिली जातील, जीवन...

November 5, 2024 3:13 PM November 5, 2024 3:13 PM

views 58

मतदान केंद्रांची संख्या वाढवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

मतदान केंद्रांवरची गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसंच मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान यंत्रांच्या बॅटरीवरून सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी मतदान सुरू करताना आणि बंद होताना मतदान यंत्रांमधल्या बॅटरी किती चार्ज होत्या, याची नोंद ठे...