December 11, 2025 8:20 PM December 11, 2025 8:20 PM

views 13

प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. द्विपक्षीय संबंधातली प्रगती, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी दोन्ही देश कार्यरत राहणार असल्याचही ते म्हणाले.    दरम्यान ट्रम्प यांनी जलद गती गोल्ड कार्ड व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. यानुसार परदेशी नागरिकांना किमान दहा लाख डॉलर्समध्ये अमेरिकेत कायमचं वास्तव्य करण्याचा आणि न...

November 27, 2025 6:45 PM November 27, 2025 6:45 PM

views 10

उद्धव-राज यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मतदारयाद्यांमधल्या त्रुटी तसंच मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या विरोधी भूमिकेबाबतही दोघांनी चर्चा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका, नाशिक आणि पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षांची आघाडी महत्त्वाची मानली जात...

October 8, 2025 3:01 PM October 8, 2025 3:01 PM

views 291

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली १२ नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.     शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्...

August 11, 2025 6:38 PM August 11, 2025 6:38 PM

views 13

राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल – उद्धव ठाकरे

महाराष्ट्र हा आजपर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महायुती सरकारमधल्या कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईसह राज्यभरात आंदोलन केलं. त्यानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केलं.   महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. भ्रष्टाचाऱ्यांना दूर करुन मंत्रिमंडळात घ्यायला दुसरे...

July 1, 2025 3:19 PM July 1, 2025 3:19 PM

views 21

मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार

राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत.   दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली आहे. मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 12

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवार यांच्या निवासस्थानी आज भेट झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात यावेळी चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या भेटी दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी नसल्याने त्यांच्याशीही चर्चा करू, असंही पाटील म्हणाले.

December 17, 2024 6:23 PM December 17, 2024 6:23 PM

views 17

उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटींमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्...

December 13, 2024 3:29 PM December 13, 2024 3:29 PM

views 16

बांग्लादेशात अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – उद्धव ठाकरे

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविषयी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, पण त्याबाबत होकार न मिळाल्यामुळं हा विषय पत्रकार परिषदेत मांडला असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

November 17, 2024 7:06 PM November 17, 2024 7:06 PM

views 17

मविआची सत्ता आल्यास वाढवण, मोरबे बंदर होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर वाढवण आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर इथल्या प्रचारसभेत सांगितलं. आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या विरुद्ध असून पालघर जिल्ह्याचा विकास महाविकास आघाडी करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

November 15, 2024 2:29 PM November 15, 2024 2:29 PM

views 18

महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

विधानसभेची यंदाची राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे. महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं.   औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे. मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला होता, असं ते म्हणाले. चिखलठाणा विमानतळाला अजून संभाजी महाराजांचं नाव का दिलं नाही, असा सवाल त्यांनी केला.