October 27, 2025 8:13 PM October 27, 2025 8:13 PM
37
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुंबईत निर्धार मेळावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज मुंबईत झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा हा स्वयंघोषित देशप्रेमी गट आहे, अशी टीका त्यांनी केली. आत्मनिर्भर भारताची निर्मिती करू इच्छिणाऱ्या पक्षाला मतचोरी करावी लागत आहे, असंही ते म्हणाले. समाजात तणाव निर्माण करून मत मिळवणं हे भाजपाचं धोरण आहे, भाजपाच्या जीएसटी धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली.