February 5, 2025 7:10 PM February 5, 2025 7:10 PM

views 1

राज्य सरकार यावर्षी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित मुंबई ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज झालं, यावेळी ते बोलत होते. मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची सुविधा आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. मराठी संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचून आत्मचिंतन करा असं आवाहन त्यांनी केलं.   ग्रंथालय डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी निधीची कम...

December 13, 2024 7:28 PM December 13, 2024 7:28 PM

views 4

रत्नागिरीत वायुगळतीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना

रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळतीप्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. त्यांनी आज रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली.

October 8, 2024 7:38 PM October 8, 2024 7:38 PM

views 1

रत्नागिरीतल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या बंदरासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साखरीनाटे, रत्नागिरी तालुक्यातलं मिरकरवाडा आणि दापोली तालुक्यातलं हर्णै ही जिल्ह्यातल्या मच्छिमारांना ताकद देणारी बंदरं आहेत, असं प्रतिपादन उदय सामंत यांनी केलं. 

October 8, 2024 3:41 PM October 8, 2024 3:41 PM

views 1

रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

रत्नागिरीतमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल झालं. शिवसृष्टीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही सामंत यांनी केली. ही शिवसृष्टी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारली असून दोन महिन्यात हिचं काम पूर्ण होईल, असं सामंत यावेळी म्हणाले.   दरम्यान, रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामाला मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल सुरुवात झाली. शहरातल्या शाळा, ...

September 27, 2024 3:04 PM September 27, 2024 3:04 PM

views 15

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, गुंतवणूकीचा हा प्रवाह असाच सुरू राहणार अ‍सल्याचं ते म्हणाले.   पुढच्या वर्षापर्यंत गडचिरोली जिल्ह्याची नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख पुसून, उद्योगनगर...

August 19, 2024 10:10 AM August 19, 2024 10:10 AM

views 1

संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी रत्नागिरीत निबे कंपनीची १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्याचा उद्योग विभाग आणि संरक्षण क्षेत्रात काम करणारी निबे लिमिटेड कंपनी यांच्यात काल रत्नागिरीमध्ये सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून सुमारे एक ते दीड हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रातला आणखी एक नवा प्रकल्प रत्नागिरीत आणला जात असून, त्यातून 10 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, असं सामंत यांनी ...

August 13, 2024 4:11 PM August 13, 2024 4:11 PM

views 12

खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा – मंत्री उदय सामंत

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी रचलेल्या खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक नाशिक इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते.

August 13, 2024 8:53 AM August 13, 2024 8:53 AM

views 9

छत्रपती संभाजीनगर इथं होणारी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल – उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा काल मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातल्या उद्योजकांनी यावेळी राज्य सरकारला मानपत्र दिलं. हे मानपत्र म्हणजे विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर असल्याचं सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं. या उद्योगांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्...

August 12, 2024 4:38 PM August 12, 2024 4:38 PM

views 4

शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू – उदय सामंत

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नुकत्याच आगीच्या तडाख्यात सापडून मोठं नुकसान झालेल्या कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली.  या  नाट्यगृहाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी निर्माण केलेला  तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही  नुकतीच भेट देऊन या नाट्यगृहाच्या नुकसानीची  पाहणी केली आहे. हे नाट्यगृह  जसं होतं तसं पुन्हा उभारण्यासाठी त्यांनी वीस कोटी रुपये अनुदान देण्याची  घोषणाही  त्यांनी यावेळी केली...

August 1, 2024 8:42 AM August 1, 2024 8:42 AM

views 1

डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा सरकारचा निर्णय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे.