May 22, 2025 8:56 PM May 22, 2025 8:56 PM

views 4

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी सुरु

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं  येत्या १५ दिवसांत ३२ वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत.    खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ताकेशी इवाया यांची भेट घेतली आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. पहलगाम इथल्या  दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांप्रती जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांनी सहवेदना व्यक्ती  केली. कोणत्याही प्रक...

January 15, 2025 2:14 PM January 15, 2025 2:14 PM

views 10

केरळच्या उद्योग मंत्र्यांनी यूएईच्या गुंतवणूक मंत्र्यांची आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनची घेतली भेट

केरळचे उद्योग मंत्री पी. राजीव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राजीव यांनी यूएईचे गुंतवणूक मंत्री मोहम्मद हसन अल सुवैदी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अहमद जसीम अल जाबी यांची भेट घेतली. येऊ घातलेल्या इनव्हेस्ट केरला ग्लोबस समिटबाबत त्यांनी आपली वचनबद्धता दर्शवली. २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्लोबल समिटमध्ये यूएई आपलं शिष्टमंडळ पाठवणार आहे.

December 12, 2024 10:35 AM December 12, 2024 10:35 AM

views 5

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संयुक्त अरब आमिरातीच्या नेत्यांचं समाजमाध्यमांवरून स्वागत केलं आहे. या भेटीमुळे उभय देशांमधली भागिदारी आणखी बळकट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि संयुक्त अरब आ...

November 17, 2024 11:44 AM November 17, 2024 11:44 AM

views 15

COP29 दरम्यान “ग्लोबल एनर्जी एफिशिएन्सी अलायन्स” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात

संयुक्त अरब अमिरातीनं अझरबैजानमध्ये आयोजित COP29 दरम्यान “ग्लोबल एनर्जी एफिशिएन्सी अलायन्स” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. 2030 पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास हातभार लावणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. हा उपक्रम COP28 मधील 'UAE एकमत' या संकल्पनेवर आधारित आहे. UAE एकमतनं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध देश आणि संस्था याना एकत्र आणलं. संयुक्त अरब अमिरातीनं ऊर्...

October 21, 2024 3:08 PM October 21, 2024 3:08 PM

views 13

भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी ४ दिवसांच्या यूएई दौऱ्यावर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशात संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारताचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आजपासून चार दिवसांच्या यूएई दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते यूएईचे नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल पायलट सईद बिन हमदान अल नाह्यान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या भेटीचं उद्दिष्ट सर्वच क्षेत्रातल्या व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या अनुषंगाने संरक्षण सहकार्य वाढवणं आणि द्विपक्षीय सागरी संबंध दृढ करणं असं आहे.  

October 7, 2024 7:41 PM October 7, 2024 7:41 PM

views 18

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांची पैसे हस्तांतरण यंत्रणा जोडण्याचे प्रयत्न

भारताची UPI आणि संयुक्त अरब अमिरातीची AANI पैसे हस्तांतरण यंत्रणा एकमेकांशी जोडण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या ३० लाख भारतीयांना सहजपणे भारतात पैसे पाठवता येतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारत आणि UAE उच्च स्तरीय संयुक्त कृती दलाच्या १२ व्या बैठकीनंतर मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते. UAE नं भारतात फूडपार्क स्थापन करायची तयारी दाखवली आहे. यात येत्या २-अडीच वर्षात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळं ...

September 5, 2024 1:32 PM September 5, 2024 1:32 PM

views 13

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची बैठक

भारत-सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्याबाबत संयुक्त समितीची सहावी बैठक काल रियाध इथं झाली. भारतीय सशस्त्र दलाचे संयुक्त सचिव, अमिताभ प्रसाद आणि सौदी अरेबियाचे सामरिक बाबींचे संरक्षण उपमंत्री, मेजर जनरल सलमान बिन अवध अल-हरबी यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या संरक्षण कार्यांचा व्यापक आढावा घेतला. या चर्चेमध्ये संयुक्त सराव, तज्ञांची देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योग सहकार्य यासह लष्करी सहकार्य, आदी विषयांचाही पैलूंचा समावेश क...

June 23, 2024 3:14 PM June 23, 2024 3:14 PM

views 14

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधल्या अनेक महत्त्वाच्या मदुद्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतल्या परस्पर भागीदारीविषयी आणि विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.