December 24, 2024 12:53 PM December 24, 2024 12:53 PM

views 6

U19 ICC क्रिकेट T-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर

महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला संघाची घोषणा केली आहे. निकी प्रसाद हिच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं असून सानिका चाळके उपकर्णधार असेल. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचं कर्णधारपद देखील निकीकडेच होतं. कमलिनी जी आणि भाविका अहिरे या दोघी यष्टिरक्षक म्हणून असतील. ही स्पर्धा पुढच्या वर्षी १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर इथे होणार आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार...

December 8, 2024 8:25 AM December 8, 2024 8:25 AM

views 9

१९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात अंतिम सामना

दुबई इथं सुरु असलेल्या १९ वर्षाखालील पुरुषांच्या आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं उपांत्य सामन्यात श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 2, 2024 7:20 PM December 2, 2024 7:20 PM

views 8

U-19 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अ-गटात भारताचा जपानवर २११ धावांनी विजय

१९ वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अ-गटात भारताने जपानचा २११ धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात जपानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर भारताने विजयासाठी दिलेलं ३४० धावांचं उद्दिष्ट गाठताना जपानचा डाव १२९ धावांवर आटोपला. अ -गटातल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातींच्या संघाला ६० धावांनी पराभूत केलं.