September 12, 2024 10:26 AM September 12, 2024 10:26 AM

views 17

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर गेली आहे. हनोईमधून काल हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. यागी हे आशियातलं या वर्षीचं सर्वातं शक्तिशाली चक्रीवादळ असून, त्यामुळे व्हिएतनाममध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हनोईतली लाल नदी वीस वर्षांमधल्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे, त्यामुळे तिच्या काठांवर्चया नागरिकांनं जनजीवन विस्कळित झालं आहे.

September 11, 2024 8:06 PM September 11, 2024 8:06 PM

views 11

व्हिएतनाममध्ये यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार, हजारो नागरिकांना वाचवण्यात यश

व्हिएतनाममध्ये झालेल्या  यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार झाले असून  हजारो नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. यागी हे आशिया खंडातलं  सर्वात  विनाशकारी वादळ ठरलं असून त्यामुळं भूस्खलन होत आहे. या वादळामुळं सोसाट्याच्या वाऱ्यांसह  जोरदार  पाऊस  पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळं व्हिएतनाम मधल्या प्रांतातला एक पूलही  उध्वस्त झाला आहे.  दरम्यान  हनोई मधल्या लाल नदीच्या पुराने गेल्या २० वर्षातली सर्वोच्च पातळी गाठली असून या नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. यागी वादळामुळं भूस्खलन  होत असून लाओ मध्य...

September 8, 2024 8:26 PM September 8, 2024 8:26 PM

views 17

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं. या वादळामुळे देशात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून १७६ जण जखमी झाले आहेत. तसंच ३० लाखांहून अधिक नागरिकांना विजेशिवाय राहावं लागत आहे. वादळ निघून गेलं असलं तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असा इशारा हवामान विभागानं  दिला आहे. व्हिएतनाम देशातल्या सुमारे ३ हजार ३०० इमारती, एक लाखाहून अधिक हेक्टर जमिनीवरची पिकं, पाच हजार हेक्टरवरच्या फळबागा आणि सुमारे एक हजार ऍक्वाकल्चर पिंजरे उद्ध्वस्त झाले आहेत. या वादळानं चीनच्या हेनन प्रांत...