November 5, 2025 12:46 PM November 5, 2025 12:46 PM
22
फिलिपीन्समध्ये काल्मेगी चक्रीवादळामुळे किमान ६६ जण ठार
फिलिपीन्समध्ये काल्मेगी या चक्रीवादळामुळे आतापर्यंत किमान ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. काल किनाऱ्याला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली असली, तरी अद्याप ताशी १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. हे चक्रीवादळ पुढे व्हिएतनामच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे.