November 10, 2025 12:24 PM November 10, 2025 12:24 PM

views 26

फिलीपिन्सिमध्ये फंग-वॉन्ग वादळाचं थैमान!

फिलीपिन्सला फंग-वॉन्ग वादळानं धडक दिली असून, साधारण ९ लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उवान नावाचं हे शक्तिशाली टायफून ताशी १८५ ते २३० किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकलं. पूर्व फिलिपिन्समध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस होत असून सोसाट्याचे  वारे वाहात असल्याची माहिती स्थानिक हवामान अधिकाऱ्यांनी दिली आहे.

November 9, 2025 1:08 PM November 9, 2025 1:08 PM

views 25

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग चक्रीवादळाचा जोर तीव्र

फिलिपिन्स मध्ये फंग-वोंग या चक्रीवादळानं तीव्र स्वरूप घेतलं असून, त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस, विनाशकारी वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशाच्या मोठ्या भागात वादळाचा इशारा देण्यात आला आला असून, पूर्व आणि उत्तरेकडच्या भागातल्या १ लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं  आहे. फिलिपिन्समध्ये ३०० पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती  नागरी हवाई वाहतूक नियामक संस्थेनं दिली.