January 16, 2025 1:43 PM January 16, 2025 1:43 PM

views 13

इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं मिळवलेलं हे यश आगामी अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. इस्रोच्या संशोधकांनी साध्य केलेलं यश हे अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय व...