March 27, 2025 3:23 PM

views 12

तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

तूर, मसूर आणि उडदाचं जेवढं उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत कृषी भवन इथं पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.   शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. शेतकऱ्यांना तूर, मसूर आणि उडदाचा योग्य भाव  मिळावा याकरता राज्यसरकारांनी प्रभावी आणि पार...