March 11, 2025 3:15 PM March 11, 2025 3:15 PM
4
अमेरिकेच्या गुप्तचर तुलसी गबार्ड भारताला भेट देणार
अमेरिकेच्या गुप्तचर विभाग प्रमुख तुलसी गबार्ड त्यांच्या हिंद- प्रशांत महासागर क्षेत्राच्या दौऱ्यात भारतालाही भेट देणार आहेत. यापूर्वी त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत भेटल्या होत्या. शांतता आणि स्वातंत्र्य या उद्दिष्टांसाठी उभय देशांदरम्यान माहितीचं आदानप्रदान आणि संवाद या विषयावर त्या प्रामुख्यानं उच्चपदस्थांशी चर्चा करतील.