November 8, 2025 12:33 PM November 8, 2025 12:33 PM
30
न्यायालयाची ट्रम्प यांना अमेरिकेतल्या राज्यांच्या विरोधात सैन्य तैनात करण्यास कायमची मनाई
अमेरिकेतल्या राज्यांमधे तिथल्या स्थानिक शासनाच्या मर्जीविरुद्ध सैन्य तैनात करायला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने कायमची मनाई केली आहे. स्थलांतर नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधातली निदर्शनं रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या सैन्य तैनातीच्या धोरणाला विरोध करणारा न्यायालयाचा हा पहिलाच निर्णय आहे. याआधी ट्रम्प यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालच्या लॉस एंजलीस, शिकागो आणि वॉशिंग्टन मध्ये सैन्य तैनात करण्याचा प्रयत्न केला आहे.