December 20, 2024 6:05 PM December 20, 2024 6:05 PM

views 5

अजमेर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रसायनांनी भरलेल्या ट्रकच्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

रसायनांनी भरलेल्या एका मालवाहू वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं लागलेल्या आगीमुळं आज सकाळी राजस्थानातल्या अजमेर जयपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या भानक्रोटा परिसरात मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ७ जण ठार तर ३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल तसंच आरोग्य मंत्री गजेंद्र सिंग खिंवसर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.   या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शोक व...