February 9, 2025 9:35 AM February 9, 2025 9:35 AM

views 16

त्रिपुरा सरकारचा विविध उदयोगां सोबत 3700 कोटी रुपयांचा करार

त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या दोन दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खाजगी गुंतवणूकदारांसोबत 3700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.   त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साहा, उद्योग मंत्री संताना चकमा आणि वरिष्ठ राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, खाजगी क्षेत्रातील गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड, क्रेन ग्लोबल सोल्युशन्स, GNRC हेल्थकेअर इत्यादी कंपन्याबरोबर सामंजस्य करार केले.

January 21, 2025 1:16 PM January 21, 2025 1:16 PM

views 14

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा आज स्थापनादिवस; राषट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांचा स्थापनादिवस आज साजरा होत आहे. राषट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्यांना स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  या राज्यांमधल्या कष्टाळू आणि उद्योगी नागरिकांनी देशाच्या विकासात हातभार लावला असल्याचं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भारताची ही तीन झगमगती रत्नं समृद्ध वारशाची आणि विविधतेत एकता या वैशिष्ट्याची प्रतिकं असल्याचं उपराषट्रपतींनी म्हटलं आहे. मणिपूरच्या जनतेने राष्ट्रविकास...

December 22, 2024 7:55 PM December 22, 2024 7:55 PM

views 10

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्रिपुरामध्ये ६६८ कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरामध्ये ६६८ कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. भाजपा त्रिपुरामध्ये सत्तेत आल्यानंतर ब्रु समुदायाच्या ४० हजार लोकांचं पुनर्वसन झाल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. ब्रु समुदायाच्या प्रश्नांकडे आधीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने लक्ष दिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. ब्रु समुदायातल्या लोकांना अनेक वर्षं मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित  राहावं लागलं. नव्या वसाहतीमुळे त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी, शौचालय, वीज जोडणी, शिक्षण अशा सुविधा मिळाल्या आहे...

December 21, 2024 9:08 AM December 21, 2024 9:08 AM

views 12

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे ईशान्य प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल व्यक्त केला. 

August 27, 2024 1:41 PM August 27, 2024 1:41 PM

views 15

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध सामाजिक आणि खासगी संस्था, डॉक्टर्स तसंच सामान्य लोकांनीही मदत कार्यासाठी देणगी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुरा रा...

August 25, 2024 7:42 PM August 25, 2024 7:42 PM

views 15

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. पूरामुळे जास्त प्रभावित झालेल्या दक्षिण त्रिपुरा आणि सेपाहिजाला जिल्ह्यांमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. भूप्रदेशाची माहिती नसल्यामुळे, अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान एनडीआरएफ समोर आहे. गोमती आणि रुद्रसागर तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सेपाहिजाला जिल्ह्यातल्या बटाली आणि घारांतली गावात लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

August 22, 2024 1:29 PM August 22, 2024 1:29 PM

views 13

त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.    मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आगरतळा इथल्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

August 20, 2024 7:53 PM August 20, 2024 7:53 PM

views 14

त्रिपुरा : भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे ७ जणांचा मृत्यू

त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन  आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला  अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.  आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारनं राज्यभरात १८३ निवारा छावण्या उभारल्या असून तिथली जिल्हा प्रशासनं पुरग्रस्त नागरिकांना अहोरात्र म...