October 8, 2024 9:50 AM October 8, 2024 9:50 AM

views 6

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल पालघर जिल्ह्यात बोलताना केली. जव्हारमध्ये आयोजित पेसा ग्रामसभा महासंमेलनात ते बोलत होते. आदिवासी विद्यापीठाअंतर्गत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येईल, यामध्ये जास्तीत जास्त जागा आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील असं ते म्हणाले.  

September 9, 2024 6:59 PM September 9, 2024 6:59 PM

views 10

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा

नाशिक इथं आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितलं. त्यांनी आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ही माहिती दिली. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या उत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्यानं या विद्यापीठातल्या विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. यावेळी विधानस...