August 8, 2024 7:01 PM August 8, 2024 7:01 PM
13
नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन
जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं तीन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवा अंतर्गत नंदुरबार शहरातून आज भव्य रॅली काढण्यात आली. यात राज्यभरातून आलेल्या आदिवासी कलापथकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे तारपा वाद्य वाजवत या रॅलीत सहभागी झाले होते. [video width="848" height="394" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/08/123.mp4"][/video]