January 14, 2025 8:55 AM January 14, 2025 8:55 AM

views 6

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार – मंत्री अशोक उईके

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्तक देऊन, संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष मुक्कामी भेट देत तिथल्या व्यवस्थेची खातरजमा करून घेण्याचे आदेश दिल्याचं, ऊईके यांनी सांगितलं.

June 24, 2024 3:13 PM June 24, 2024 3:13 PM

views 10

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागानं गेल्या २३ नोव्हेंबर रोजी ६०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास संवर्गांचा जाहिरातीत समावेश नसल्यानं ही जाहिरात रद्द करण्यात आली आहे. यादी अद्ययावत झाल्यानंतर पुढील कार्यवाहीविषयी माहिती दिली जाईल असं अधिकृत सूत्रांनी कळवलं आहे.